loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्रशासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रोटरी स्कूलमध्ये ध्वजारोहण

खेड, (प्रतिनिधी) - दिनांक - १४ ऑगस्ट २०२६ स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या ’हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत शुक्रवार दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. ’वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताने ध्वजारोहणाच्या राष्ट्रीय सोहळ्याची मंगलमय सुरुवात झाल्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर शाळेच्या पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. त्यानंतर उपस्थितांनी ध्वजनिष्ठ प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांनी शाळेतील क्रीडाशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहणाच्या राष्ट्रीय सोहळ्याप्रसंगी रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, उच्चमाध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, पूर्वमाध्यमिक विभागप्रमुख सौ. देवयानी महाजन, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काव्या शिंदे व सिध्दी पेवेकर यांनी केले. संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी केंद्रशासनाच्या ’हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत दिनांक १४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg