loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंबळे ग्रामपंचायतीचे सामाजिक दायित्व, प्राथमिक आरोग्य केंद्राला इन्व्हर्टर भेट

मंडणगड (प्रतिनिधी) - कुंबळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्यावश्यक असलेले इन्व्हर्टर तसेच पाण्याची मोटार ग्रामपंचायतीने भेट देऊन सद्यस्थितीत त्यांचे महत्वाचे काम मार्गी लावले आहे. कुंबळे ग्राम पंचायतीच्या या महत्त्वपूर्ण सामाजिक बांधिलकीच्या कामाचे कुंबळे परिसरातील रहिवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कुंबळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे कुंबळे या गावासह परिसरातील गावांसाठी महत्त्वाचे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात काही महत्त्वाच्या आणि अत्यावश्यक अशा साहित्याची प्राथमिक आरोग्य केंद्राला गरज होती. त्यातील २ इन्व्हर्टर तसेच एक पाण्याची मोटार असे गरजेचे साहित्य कुंबळे ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामनिधी फंडातून उपलब्ध करून दिले. उपलब्ध करून देण्यात आलेल्या या साहीत्याचा साहित्य प्रदान सोहळा कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्रात कुंबळे ग्राम पंचायतीच्या सरपंच सौ सानिका महेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी सौ दीपाली गुळेकर, उपसरपंच सौ तन्वी महेंद्र महाजन, प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रद्युमन शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg