वरवेली (वार्ताहर) - गुहागर तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा जानवळे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी सोनावणे यांच्याकडे सुपूर्द केला. वैभवी विनोद जानवळकर यांच्या रूपाने जानवळे गावामध्ये मनसेने २०१७ रोजी पहिले खाते खोलले होते. त्यावेळी २०२१ रोजी उपसरपंच निवडणूकित मनसेच्या वैभवी विनोद जानवळकर यांचा कुलकर्णी यांच्यासमोर एका मताने पराभव झाला होता. यानंतर पुन्हा २०२२ मध्ये सदस्य पदाची निवडणूक विजयी झाल्यानंतर ठराविक सदस्यांनी उपसरपंचपदी वैभवी विनोद जानवळकर यांची निवड व्हावी, असा ग्रामस्थ यांनी आग्रह धरला.
त्यानुसार मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या सौभाग्यवती वैभवी जानवळकर यांची १ ऑक्टोबर २०२४ मध्ये बिनविरोध निवड झाल्याने गावामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. गावातील लोकांनी एकजुटीने दिलेला हा निर्णय जानवळकर कुटुंबासाठी समाधानकारक असल्याचे मत त्यावेळी उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर यांनी व्यक्त केले. दरम्यान उपसरपंच पदाचा आपल्याला दिलेला कालावधी ठरल्याप्रमाणे संपला असल्याने वैभवी विनोद जानवळकर यांनी स्वतःहून आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा ग्रामसेवक सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
ज्याप्रमाणे आपल्याला मोठ्या विश्वासाने गावाने व सदस्य यांनी पदावरती विराजमान केले. त्याचप्रमाणे आपल्याला दिलेला कालावधी संपल्याने त्यांनी स्वतः राजीखुशीने दिलेला शब्द पाळत वैभवी जानवळकर यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैभवी जानवळकर यांनी आपल्या उपसरपंच पदाच्या कालावधीत अनेक सामाजिक कामे व विकास कामे केली आहेत. त्यांना त्यांच्या कोरोनातील कामाबद्दल शितल राजे फाउंडेशन चिपळूण कोकण फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट चिपळूण यांच्यावतीने सन्मानपत्र देऊन कोविड योद्धा म्हणून देखील सन्मानित करण्यात आले होते.

1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.