loader
Breaking News
Breaking News
Foto

चिमुकल्यांचे प्रेम सीमेवर पोहचणार! चिखलगावच्या विद्यार्थ्यांकडून एक राखी जवानांसाठी उपक्रम!

दापोली, चिखलगाव (सागर गोवळे)- :स्वातंत्र्यदिनाचा उत्साह देशभरात शिगेला पोहोचला असतानाच, जिल्हा परिषद मराठी शाळा, चिखलगाव येथील विद्यार्थ्यांनी देशरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र पहारा देणार्‍या सैनिकांप्रती अनोखी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला (१४ ऑगस्ट) शाळेत एक राखी जवानांसाठी हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी बाजारातून तयार राख्या न विकत घेता, स्वतःच्या हाताने सुंदर आणि आकर्षक राख्या तयार केल्या! देशाचे रक्षण करणार्‍या जवानांना दीर्घायुष्य आणि सुरक्षितता लाभावी, या भावनेने मुलांनी या राख्या अत्यंत प्रेमाने तयार करून लिफाफ्यात सुरक्षित पॅक केल्या आणि पोस्टाद्वारे थेट सीमेवरील जवानांकडे रवाना केल्या. चिमुकल्यांच्या या उपक्रमाने सर्वांचीच मने जिंकून घेतली. हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक नांदगावकर, शिक्षिका सातपुते आणि माजी शिक्षिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नेटकेपणाने पार पडला. या प्रसंगी गावातील ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg