loader
Breaking News
Breaking News
Foto

नवनिर्माण महाविद्यालयात देशभक्तीपर गीतांनी रंगली सुरांची मैफल, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

संगमेश्वर, (प्रतिनिधी) - लोवले-संगमेश्वर येथील भाई हेगशेट्ये कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तीपर समूहगीत गायन, एकल गायन आणि एकल वाद्य वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने परिसरात अक्षरशः सुरांचा वर्षाव झाला. यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये म्हणाले की, संस्थेतील शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मेहनत घेत आहेत. केवळ प्रथम क्रमांक मिळविणार्‍या विद्यार्थ्याचाच गौरव न करता शेवटच्या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्याच्या प्रयत्नांचाही गौरव झाला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्तीची आवड आणि आत्मविश्वास निर्माण करणे हा अशा उपक्रमांचा महत्त्वाचा उद्देश आहे. नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये म्हणाल्या की, कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता आहे. या क्षमतेला योग्य दिशा देऊन ती वृद्धिंगत करण्याचे काम नवनिर्माण शिक्षण संस्था करीत आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही संधी मिळावी, यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संजना चव्हाण, संगीत विशारद स्वरूप जोगळेकर आणि गायन विशारद अमोघ पेंढारकर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण स्वरूप जोगळेकर व अमोघ पेंढारकर यांनी केले. या स्पर्धेची सुरुवात बाल तबला वादक रुदित्य गौरी भोसले याच्या तबला वादनाने झाली. स्पर्धेचा निकाल - देशभक्तीपर समूहगीत गायन लहान गट प्रथम मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली द्वितीय न्यू इंग्लिश हायस्कूल, कसबा तृतीय दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी व माध्यमिक आश्रमशाळा, निवे उत्तेजनार्थ शिवाजी माध्यमिक विद्यालय, वांजोळे, मोठा गट - प्रथम मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली, द्वितीय माध्यमिक विद्यालय, करजुवे, तृतीय माध्यमिक आश्रमशाळा, निवे, उत्तेजनार्थ दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी, एकल वाद्य वादन ताल वाद्य प्रथम तुरळ हायस्कूल, द्वितीय माध्यमिक आश्रमशाळा, निवे, तृतीय भाईशा घोसाळकर हायस्कूल, कडवई, एकल वाद्य वादन सूर वाद्य, प्रथम न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख, द्वितीय न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख, तृतीय दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी, एकल गायन प्रथम माध्यमिक आश्रमशाळा, निवे, द्वितीय मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली, तृतीय दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ संतोष खरे, प्राध्यापक प्रशांत जाधव, नेहा वायंगणकर यांनी तर आभार पूजा प्रसादे हिने मानले. स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देशभक्तीपर गीतांसह गायन व वादनाचे सुरेल सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मविश्वासालाही नवी उभारी मिळाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg