रत्नागिरी : (जमीर खलफे) - कोंकण विभाग व घरडा इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी महाविद्यालय, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ, कोंकण विभाग क्र. ४ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन पुरुष आणि महिला टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन दि. १० ते १२ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या महिला संघाने कांस्य पदकासहीत तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर पुरूष संघाने सुवर्ण पदकासहीत कोंकण विभाग टेबल टेनिस सन २०२६-२७ स्पर्धेचे अजिंक्यपद प्राप्त केले.
सुवर्ण पदक प्राप्त महाविद्यालयाच्या पुरुष टेबल टेनिस संघात अथर्व म्हस्के, आदित्य शिर्के, रोहन जाधव, आदित्य लांजेकर (तृतीय वर्ष विज्ञान); विशाल परिहार (तृतीय वर्ष बीबीए) हे विद्यार्थी सहभागी झाले होते. तर कांस्य पदक प्राप्त महिला टेबल टेनिस विजयी संघात स्नेहा कदम, मैथिली डोर्लेकर, श्रावणी शिंदे (तृतीय वर्ष विज्ञान), समृध्दी मुळ्ये, आदिती जड्यार (तृतीय वर्ष बीबीए) या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. महाविद्यालयाच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन व क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, श्रीपाद गुरव यांचे सहकार्य लाभले. सदर स्पर्धेत सुयश प्राप्त करणार्या सर्व खेळाडूंचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे. जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकिय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य, डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.