loader
Breaking News
Breaking News
Foto

‘रिपाइं’च्या खेड तालुका युवक अध्यक्षपदी विकास धुत्रे यांची फेरनियुक्ती

खेड : (प्रतिनिधी) - तालुक्यातील संघलट गावचे सुपुत्र, सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले युवा कार्यकर्ते विकास धुत्रे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या खेड तालुका युवक अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेतृत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी असलेली बांधिलकी, तालुक्यातील युवकांशी असलेला दांडगा जनसंपर्क, प्रभावी संघटन कौशल्य तसेच सामाजिक व शासकीय योजनांचा अनुभव या कार्याची दखल घेत पक्षाने पुन्हा एकदा विकास धुत्रे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार तसेच कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विकास धुत्रे यांची खेड तालुका युवक अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली. फेरनियुक्तीनंतर विकास धुत्रे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत खेड तालुक्यात युवकांची मजबूत संघटनात्मक फळी उभी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg