loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण विभागात समुद्रातील मासेमारी सुरु

रत्नागिरी (डिजीटल डेस्क) - रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गसह समुद्रातील मासेमारीला आजपासून सुरुवात झाली. त्यामुळे आता समुद्रकिनार्‍यावरील बंदर गजबजुन गेले आहे. मासेमारी सुरु झाल्याने बाजारपेठांमध्ये आता आर्थिक उलाढालींना वेग येणार आहे. यंदा १५ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारचे मत्स्य उत्पादन होईल, असे म्हटले जात आहे. सुमारे ७५ दिवस मासेमारी बंद असल्याने मच्छिमारांना आपल्या नौका आणि जाळी सुस्थितीत ठेवण्यात यश आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदा देखील मच्छिमारांसमोर डिझेलचा प्रश्न गंभीररित्या उभा असून कामगारांचाही तुटवडा आहे. अशा स्थितीत मासेमारी सुरु झाली आहे. आज सकाळी कोकण किनारपट्टीवर सुमारे ३ हजार पेक्षा अधिक नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्याचे म्हटले जात आहे. सध्या श्रावण महिना सुरु असल्याने मासे निर्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे मासे अधिक दराने विक्री केले जातील. गेल्या दोन वर्षांपासून मासेमारीवर परिणाम झाला आहे. यंदा १५ दिवस वाढवून मिळाल्याने मच्छिमारांना अधिक लाभ होण्याची शक्यता आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg