loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू इंग्लिश स्कूल मोहाने ऐनवली देवघर विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

खेड - सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मोहाने ऐनवली देवघर या विद्यालयामध्ये दिनांक 15 /8 /2026 रोजी सकाळी आठ वाजता 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी प्रथम ध्वजाला मानवंदना देण्यात आली. मोहाने गावातील माजी सैनिक वसंत गोविंद विचारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, राज्य गीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीतांचे गायन केले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी एका तालामध्ये म्युझिकल कवायतीचे सादरीकरण केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी शालेय समिती चेअरमन संतोष मोरे, केंद्रप्रमुख नलावडे, सर्व ग्रामस्थ, पोलीस पाटील, गावचे सरपंच, सर्व शालेय समिती सदस्य, ग्रामसेविका, प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर एस एस सी परीक्षा मार्च 2026 मधील गुणवंत विद्यार्थ्यांना सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारी बक्षीसे तसेच गावातील शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी ठेवलेल्या ठेवीतून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून देण्यात येणाऱ्या बक्षीसांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक नायकल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोसले यांनी केले. विद्यालयाचे लिपिक शत्रुघ्न मोरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg