loader
Breaking News
Breaking News
Foto

डेगवे येथे पिंपळाचे झाड कोसळले; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

दोडामार्ग (प्रतिनिधी) : डेगवे येथे मुख्य रस्त्यावर १४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास पिंपळाचे मोठे झाड अचानक कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. झाड रस्त्याच्या दोन्ही बाजूंवर आडवे पडल्याने दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णपणे खोळंबली. झाड कोसळल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या सुमारे दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. घटनास्थळी झाड हटविण्याचे काम सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रसामग्रीच्या मदतीने अडथळा दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र दुपारी २ वाजेपर्यंतही वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नव्हती. दरम्यान, मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg