loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गातील धोकादायक झाडे १० दिवसांत हटविणार; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

तिलारी (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यालगत असलेली धोकादायक झाडे तातडीने हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. या मागणीची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत रस्त्यालगतची धोकादायक झाडे १० दिवसांत तोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष गुणाजी उर्फ बाबू गवस यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. यावेळी सुधीर चांदेलकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील विविध प्रमुख रस्त्यांच्या कडेला अनेक धोकादायक झाडे उभी असून, पावसाळ्यात ही झाडे वाहनचालक तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करू शकतात. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करत बाबू गवस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर केले होते. मागणीवर कार्यवाही न झाल्यास १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

टाईम्स स्पेशल

या निवेदनाची दखल घेत दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी गवस यांना लेखी पत्राद्वारे कार्यवाहीची माहिती दिली. संबंधित रस्त्यांवरील धोकादायक झाडे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, उर्वरित काम १० दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दोडामार्ग-बांदा मार्गासह कोल्हापूर-चंदगड-तिलारी-दोडामार्ग-अस्नोडा या राज्य मार्गावरील धोकादायक झाडांबाबतही संबंधित विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर गुणाजी उर्फ बाबू गवस यांनी आमरण उपोषण मागे घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg