loader
Breaking News
Breaking News
Foto

खोदाई दुरुस्तीचा खर्च कोणी करावा या प्रश्नावरून मालवण शहरातील भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडले !

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभागीय कार्यालय मालवण येथे विद्युत वितरण, ग्राहक पंचायत शाखा मालवण आणि वीज ग्राहक यांची संयुक्त ’ऊर्जा मित्र बैठक’ पार पडली. या बैठकीत ग्राहकांनी मालवण शहरातील रखडलेल्या भूमिगत वीज वाहिनीचे कामाबाबत प्रश्न उपस्थित केले असता या कामासाठी होणार्‍या रस्ता खोदाईनंतर खोदाई दुरुस्तीपोटी खर्च करावयाची रक्कम कोणी द्यावी या प्रश्नावर वीज वितरण कंपनी, मालवण नगरपालिका व संबंधित ठेकेदार यांच्यात अद्याप कोणताही निर्णय होऊ न शकल्याने हे काम रखडल्याचे स्पष्ट झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीत उपस्थित वीज ग्राहकांनी विविध वीज समस्या मांडल्या. या प्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालवण शाखा सहसंघटक वफा खान यांनी आपली नाराजी व्यक्त करत यातील अनेक तक्रारी वारंवार व पुनरावृत्तीने समोर येत आहेत. महावितरण प्रशासनाने यावर आता विलंब न लावता त्वरित आणि कायमस्वरूपी कार्यवाही करावी, असे त्या म्हणाल्या.

टाइम्स स्पेशल

बैठकीदरम्यान मालवण शहरातील रखडलेल्या भूमिगत वीज वाहिनीच्या कामाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या कामाबाबत प्रश्न विचारला असता महावितरणच्या अभियंत्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. महावितरणने मालवण नगरपालिकेकडे सादर केलेल्या अहवालानंतर, नगरपालिकेकडून खोदाई आणि दुरुस्तीपोटी ७ कोटी १५ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष नियमानुसार महावितरणचा ठेकेदार जेवढी खोदाई करेल, त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी आणि तरतूद ठेकेदाराचीच असते. नगरपालिकेला एवढी मोठी रक्कम भरणे महावितरणला शक्य नसल्याने हे काम सध्या रखडले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आणि समोरासमोर चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी दि. २ सप्टेंबर रोजी मालवण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. या ’ऊर्जा मित्र बैठकी’ला महावितरण व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी व वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg