loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत मॅटवरील नाईट कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार!

रत्नागिरी : श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था यांच्या वतीने गोपाळकृष्ण अष्टमी उत्सवानिमित्त, रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ‘श्री राधाकृष्ण करंडक २०२६’ मॅटवरील नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७, १८ व १९ ऑगस्ट २०२६ रोजी श्री राधाकृष्ण मंदिर, बाजारपेठ, रत्नागिरी येथे या रोमांचक कबड्डी स्पर्धेचे आयोजन होणार आहे. दमदार चढाया, भक्कम पकडी, वेगवान हालचाली आणि अटीतटीच्या लढतींमुळे मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून कबड्डीप्रेमींना नाईट कबड्डीचा अविस्मरणीय अनुभव मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मॅटवर रंगणाऱ्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध नामांकित संघांचा सहभाग अपेक्षित असून, प्रत्येक सामन्यात विजयासाठी खेळाडूंमध्ये तीव्र चुरस पाहायला मिळणार आहे. पारंपरिक कबड्डी खेळाला आधुनिक मॅटची जोड आणि रात्रीच्या प्रकाशझोतात होणाऱ्या सामन्यांमुळे या स्पर्धेचे आकर्षण अधिकच वाढणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख वेदांत मालुष्टे, युवराज शेट्ये व इंद्रजीत रेडीज असून, अधिक माहितीसाठी अजिंक्य धुंधूर (९४०३९४१५०१) व प्रसाद वाडकर (७९७२०५९६५४) यांच्याशी संपर्क साधावा.

टाईम्स स्पेशल

कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या आवडत्या संघांना प्रोत्साहन द्यावे आणि मॅटवरील नाईट कबड्डी स्पर्धेचा थरार प्रत्यक्ष अनुभवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg