मालवण (प्रतिनिधी) - ठेकेदाराकडून एक महिन्यांचा पगार थकीत राहिल्याने काल अचानक कामबंद आंदोलन छेडणाऱ्या मालवण नगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांना थकीत पगार सुपूर्द करण्यात आला आहे. सणासुदीचा काळ असल्याने पगाराविना कामगारांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर आणि आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांच्या प्रयत्नातून कामगारांना थकीत पगार मिळवून देण्यात आला. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, आरोग्य व स्वच्छता सभापती यांची आश्वासनपूर्ती केल्याने कामगारांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांना संबंधित ठेकेदाराकडून एका महिन्याचा पगार न मिळाल्याने कामगारांनी प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता काल सकाळी अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. यावेळी आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी कामगारांच्या समस्या जाणून घेत ठेकेदाराशी चर्चा केली तर मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर आणि उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी कामगारांची मागणी लक्षात घेत पगार देण्याची ग्वाही दिल्याने सुमारे पाच तास चाललेले हे कामबंद आंदोलन कामगारांनी मागे घेत काल दुपारपासून पुन्हा कामावर परतले होते. यावेळी झालेल्या चर्चेत बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हेही सहभागी झाले होते.
ऐन सणासुदीच्या काळात पगार थकीत राहिल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला होता. या काळात कामगारांची पगाराविना गैरसोय होऊ नये तसेच त्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत याचा विचार करण्यात आला. त्यानुसार दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नगरध्यक्षा ममता वराडकर, उपनगरध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या प्रयत्नातून स्वच्छता कामगारांना काल रविवारी सायंकाळी एक महिन्याचा थकीत असलेला पगार देण्यात आला आहे. यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.