loader
Breaking News
Breaking News
Foto

करूळ बौद्धवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीचे उद्घाटन

वैभववाडी(प्रतिनिधी)- करूळ बौद्धवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीचे (रोहित्र ) उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील व पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. करूळ बौद्धवाडी येथील जुनी डीपी जीर्ण झाल्याने धोकादायक बनली होती. त्यामुळे या ठिकाणी नवीन डीपी बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. ग्रामपंचायत करूळच्या वतीने यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नवीन डीपी मंजूर करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पालकमंत्री राणे यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत आवश्यक सूचना दिल्यानंतर संबंधित यंत्रणेने नवीन डीपी बसविण्याचे काम पूर्ण केले. नवीन डीपीमुळे गावातील बहुतांश वाडीतील व परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

उद्घाटनप्रसंगी सरपंच नरेंद्र कोलते, माजी सरपंच हिंदुराव पाटील, रवींद्र पवार, प्रकाश सावंत, महेश कदम, सचिन कोलते, रोहिणी लाड, शरद सावंत, राजेंद्र गुरव, सिद्धेश कोलते, सुधीर पवार, विजय पवार, दिलीप पवार तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी तळेकर, वायरमन गायकवाड, पाटणकर, अवि गुरव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg