loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्ह्यातील डी.एड, बी.एड. सुशिक्षित बेरोजगारांनी आमदार प्रमोद जठार यांची घेतली भेट

रत्नागिरी : रत्नागिरी येथील डी.एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगार शिक्षक प्रतिनिधींनी आमदार प्रमोद जठार यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन आपल्या विविध समस्या मांडल्या. शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळावी, यासाठी शिक्षक भरती जिल्हासंवर्ग करण्यात यावी तसेच किमान ८० टक्के भरती स्थानिक उमेदवारांमधून करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने डी.एड. बी.एड. पात्रताधारक सुशिक्षित बेरोजगार असून, स्थानिक उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यातच रोजगाराची संधी मिळावी, अशी भूमिका शिक्षक प्रतिनिधींनी आमदार प्रमोद जठार यांच्यासमोर मांडली. जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता असताना स्थानिक पात्र उमेदवारांना रोजगारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासन स्तरावर हा प्रश्न प्रभावीपणे मांडावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

टाईम्स स्पेशल

यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी शिक्षक प्रतिनिधींच्या समस्या व मागण्या जाणून घेत त्याबाबत योग्य त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, स्वानंद रानडे, संतोष साखरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर, रुपेश कदम, प्रतीक देसाई, शिक्षक संघटना अध्यक्ष सुदर्शन मोहिते यांच्यासह डी.एड. बी.एड. शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg