loader
Breaking News
Breaking News
Foto

शासनाची वाट न पाहता ग्रामस्थांचे श्रमदान; पाळये-तिठा रस्त्याची केली साफसफाई

तिलारी (प्रतिनिधी), : पाळये ते पाळये तिठा या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी-झुडपे तसेच रस्त्यावर पडलेले किरकोळ खड्डे यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना त्रास होत होता. याची दखल घेत गावातील जागरूक ग्रामस्थांनी शासनाच्या कोणत्याही विभागाची वाट न पाहता पुढाकार घेत श्रमदानातून रस्त्याची साफसफाई व खड्डे बुजविण्याचे काम केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी-झुडपे कापून रस्ता मोकळा केला. तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे माती व खडीच्या साहाय्याने बुजवून वाहतुकीसाठी रस्ता अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून, सार्वजनिक कामांसाठी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता गावकऱ्यांनी दाखविलेला हा सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरत आहे.

टाईम्स स्पेशल

या श्रमदान उपक्रमात सिद्धार्थ केसरकर, सुनील माजिक, राजेश देसाई, विठ्ठल दळवी, उत्तम दळवी, पिंट्या दळवी, सूर्याजी झेंडे, वासुदेव कदम, मनोहर कदम, चंद्रकांत कदम, अनिकेत सुतार, दीप दळवी, राजाराम दळवी, विलास समर्थ, तुकाराम दळवी, सूर्यकांत दळवी, सदाशिव दळवी, ज्ञानेश्वर पवार आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg