loader
Breaking News
Breaking News
Foto

जांभुळनगरात ‘जल अर्पण दिवस’ साजरा

मंडणगड(प्रतिनिधी) - जांभुळनगर जल जीवन मिशन(नळपाणी) योजनेचे काम पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा परीषद, पंचायत समिती मंडणगड व ग्रुप ग्रामपंचायत पालवणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जल अर्पण दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंडणगडचे अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या जांभूळ नगरातील जल अर्पण दिवस कार्यक्रमात जांभूळनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी बचत उपाय व नियोजनाबाबत सामुहीक शपथ घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थ्यांनी घोषणा देत जलदिंडी काढून जनजागृती केली. जांभुळनगर गावाच्या प्रवेशद्वाराजवळ जांभुळ, चिंच, सिसा, कडुलिंब, साग, पिंपळ आणि वड आदी. विविध वृक्षांची लागवड करत वृक्षारोपण केले.

टाइम्स स्पेशल

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जांभूळनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मनोहर गुजर, पालवणी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन गुजर, पालवणी तंटामुक्त अध्यक्ष लवु गुजर, पालवणी पोलिस पाटील नितेश जोशी, सतिष गुजर, अखिल पालवणी उत्सव कमिटी खजिनदार अनिल जोशी, जितेंद्र साळवी, मथंन कांबळे, अमन वळवी, ग्रामपंचायत आधिकारी प्रतिक रहाणे, सतिष गुजर, शाताराम भेकरे, नामदेव जोशी आणि न्यू इग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, जांभुळनगर ग्रामस्थ, महीला, पालवणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg