loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील दर्गारोड खड्डेमुक्त करण्यासाठी उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर आणि गुल्या नेवरेकर यांचा स्वखर्चाने प्रयत्न, सामाजिक बांधिलकी

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) लांजा शहरातील अंतर्गत महत्वाचा दर्गा रोड खड्डेमय बनल्यामुळे वाहतुकीस धोकादायक ठरत असल्यामुळे अखेर रस्त्यावरील खड्डे नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर आणि पाणी सभापती गुल्या नेवरेकर यांनी स्वखर्चाने बुजवून मार्ग सुरळीत केला असुन या दोघांनी सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा शहरातील दर्गाकडे जाणारा रस्ता हा गेल्या काही दिवसांपासून खड्डेमय बनला होता. त्यावरून वाहने चालवताना वाहन चालकांची त्रेधा तिरपीट उडत होती. तर शालेय विद्यार्थ्यांची देखील मोठी गैरसोय होत होती. १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीच्या वतीने या ठिकाणी खड्ड्यात वृक्षारोपण करून निषेध व्यक्त करण्यात आला होता.

टाईम्स स्पेशल

दरम्यान येथील नागरिक विद्यार्थी यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर तसेच पाणी सभापती गुल्या नेवरेकर यांच्याकडून स्वखर्चाने खडीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आणि रस्ता वाहतूकयोग्य करण्यात आला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg