loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधील शहरी भागात प्रथमच आढळला 'बांबू पिट वायपर' 'चापडा' जातीचा दुर्मिळ विषारी साप

खेड (दिलीप देवळेकर) - खेड शहरातील महात्मा फुले नगर येथील मानवी वस्तीच्या ठिकाणी 'बांबू फिट वायपर'. 'चापडा' जातीचा अत्यंत विषारी साप आढळून आला. तात्काळ स्थानिक रहिवाशांनी वन्यजीव रक्षकांना फोन केल्यानंतर, वन्यजीव रक्षक सर्वेश पवार, रोहन खेडेकर, ओमकार चिखले व नगरसेवक यश खेडेकर यांनी घटनास्थळी जाऊन सदर सापाला व्यवस्थितरित्या रेस्क्यू करून पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. हा दुर्मिळ साप मानवी वस्तीच्या जवळ आढळल्याने शहरातील सर्व सर्पमित्रांच्या भुवया उंचावल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा साप जास्त करून घनदाट जंगले, बांबूची बेटे, झुडपे आणि ओलसर भागात जास्त करून वास्तव्य करतात. या सापाला झुडुपांवर किंवा वेलींवर राहणे पसंद करतो. हा निशाचर व शांत असतो, पण जवळ गेल्यास किंवा अचानक स्पर्श झाल्यास वेगाने दंश करू शकतो. याचे विष हेमोटॉक्सिक (Hemotoxic) स्वरूपाचे असते, ज्यामुळे रक्ताभिसरण व पेशींवर परिणाम होतो.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg