loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वात नव्या कार्यकारी मंडळाची घोषणा, विनोद तावडे महामंत्री पदावर कायम

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी यांनी आपल्या नव्या कार्यकारी मंडळाची घोषणा केली आहे. भाजपाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आज निवडण्यात आली. वसुंदराराजे, राम माधव यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनविण्यात आले. स्मृती ईराणी यांना नव्या टीममध्ये महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी उत्तर प्रदेश राज्याचे संघटन वाढविण्याचे कामगिरी करायची आहे. बीएल संतोष यांना राष्ट्रीय महामंत्री तर जयप्रकाश आणि राजीव बब्बर यांनाही कार्यकारिणीत घेण्यात आले आहे. दिल्लीचे पूर्व प्रदेशअध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांना संधी देण्यात आली नाही. आम आदमी पक्षातून भाजपात आलेले संदीप पाठक यांनाही बाजूला ठेवण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजपाने १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महामंत्री निवडले आहेत. नव्या कार्यकारी मंडळात एम. नागराजा, लालससिंह आर्य, वर्षाबेन दोषी यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनविण्यात आले आहे. बैजयंत जय पांडा, रेखा वर्मा, मधचंद्र हे कार्यकारी मंडळात कायम आहेत. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत, माजी केंद्रिय मंत्री भारती पवार, मनप्रीत सिंह बादल, तारिख मनसूर यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. भाजपाने बीएल संतोष यांना महासचिव पदावर कायम ठेवले. भारती प्रविण पवार यांना महाराष्ट्रातून राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले आहे. शिवप्रकाश यांना मुंबईतून राष्ट्रीय सह महामंत्री, विनोद तावडे महाराष्ट्र राष्ट्रीय महामंत्री, सोशल मिडीया संयोजक महाराष्ट्र म्हणून प्रिती गांधी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg