loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट प्रशालेत 'जागतिक छायाचित्रण दिन' विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

मालवण, (प्रतिनिधी) - छायाचित्रण ही केवळ एक कला नसून ते विज्ञानही आहे. सध्याच्या काळात फॅशन व मॉडेल फोटोग्राफी, वाइल्ड लाईफ व नेचर फोटोग्राफी, जर्नालिझम व डॉक्युमेंटरी, प्रॉडक्ट व अॅड फोटोग्राफी, फाईन आर्ट तसेच एरियल व ड्रोन फोटोग्राफी यांसारख्या विविध क्षेत्रांत करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने या संधीचा उपयोग करावा असे प्रतिपादन श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाटचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी येथे बोलताना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई संचलित श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत 'जागतिक छायाचित्रण दिन' विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कुबल हे बोलत होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये टिपलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन कला दालनात भरवण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. छायाचित्रण कलेचा इतिहास, तिचे समाजातील महत्त्व आणि निसर्ग व संस्कृती जतन करणे याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, तसेच त्यांच्यातील निरीक्षणशक्ती व सर्जनशीलतेला वाव मिळावा, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

टाईम्स स्पेशल

प्रदर्शनातील विजेत्या छायाचित्रांचे परीक्षण शिक्षिका वेदिका दळवी व प्रतिभा केळुसकर यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत आर्या रामचंद्र भांडे हिने प्रथम, निधी निनाद धारपवार हिने द्वितीय तर सिया सचिन पाताडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ सिद्धी भरत पालव, नेहा नामदेव वरक आणि श्रवण महेश सावंत यांना गौरविण्यात आले. या उपक्रमाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी सर्व सहभागी आणि विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg