रत्नागिरी : सहकारी बँकांच्या संचालकांना राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आता १० वर्षांचा कार्यकाळ किंवा दोन वेळा संचालक पदाची टर्म पूर्ण झाल्यानंतरही संबंधितांना आगामी निवडणुका लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचा थेट फायदा रत्नागिरी जिल्हा बँकेतील अध्यक्षांसह उपाध्यक्ष आणि दहाहून अधिक संचालकांना होणार असून, ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावू शकतील. या पार्श्वभूमीवर, बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी नव्या नियमानुसार यापूर्वी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सहकार विभागाच्या या नव्या निर्णयामुळे आणि सभासदांच्या वाढत्या दबावामुळे ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे आता संपूर्ण सहकार क्षेत्राचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
यापूर्वीच्या नियमांनुसार एखाद्या व्यक्तीने पाच वर्षांच्या दोन टर्म म्हणजेच सलग १० वर्षे संचालक म्हणून काम पूर्ण केल्यानंतर त्याला तिसर्यांदा निवडणूक लढवण्यास मज्जाव करणारी तरतूद होती. त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांवर निवडणुकीपासून दूर राहण्याची वेळ आली असती. मात्र, सहकार विभागाने घेतलेल्या भूमिकेला विधी आणि न्याय विभाग तसेच संबंधित तज्ज्ञांनीही सहमती दर्शवली आहे. त्यामुळे दहा वर्षांच्या या मर्यादेमुळे संचालकांना तिसर्यांदा निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाणार नाही, असा स्पष्ट निर्णय समोर आला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्हा बँकेतील जुने व अनुभवी संचालक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने, नवीन व इच्छुक उमेदवारांमध्ये मात्र मोठी चलबिचल पाहायला मिळत आहे.
जुने संचालक कायम राहिल्यामुळे सहकार क्षेत्रात आपले भविष्य पाहणार्या नवीन आणि उमेदीच्या कार्यकर्त्यांची मोठी निराशा होण्याची शक्यता असून, यामुळे इच्छुकांची चांगलीच दमछाक होणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर संपूर्ण राज्यभरात आणि प्रामुख्याने पश्चिम भागात सहकारी संस्थांचे आणि बँकांचे अतिशय मोठे जाळे पसरलेले आहे. या निर्णयामुळे सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, दोन्ही बाजूंच्या अनेक मातब्बर नेत्यांना आणि सहकार क्षेत्रातील जुन्या संचालकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी नवोदित इच्छुकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.