loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीराम मंदिरात दि.२४ ते २६ ऑगस्ट रोजी भगिनींच्या झिम्मा फुगडी व उखाणे स्पर्धा

रत्नागिरी, - येथील श्रीराम मंदिरात श्रावणी मंगळागौर निमित्त दि. २४ ते २६ ऑगस्ट २०२६ असे सलग ३ दिवस भगिनींच्या झिम्मा फुगडी व उखाणा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत सर्व वयोगटाच्या भगिनींनी व युवतींनी आवर्जुन सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील सुप्रसिध्द श्रीराम मंदिरात सालाबाद प्रमाणे यावर्षीही श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने श्रावणी मंगळवार निमित्त भगिनींचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतील. भगिनींच्या झिम्मा व उखाणा स्पर्धा व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सोम. दि. २४ ते बुध. दि. २६ ऑगस्ट २०२६ असे सलग ३ दिवस दररोज सायं. ४ ते ७ या वेळेत संपन्न होतील. हे कार्यक्रम श्रीराम मंदिर सभागृह, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी भगिनींच्या विविध प्रकारच्या झिम्मा फुगडी स्पर्धा व उखाणे स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या झिम्मा फुगडी स्पर्धेत भगिनी वैयक्तिकरित्या तसेच भगिनी मंडळे विविध स्वरुपाचे कार्यक्रम सादर करु शकतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही. संयोजकांकडून ध्वनी मुद्रण व्यवस्था करण्यात येईल. स्पर्धकांना १ किंवा अधिक जास्त स्पर्धेत सहभागी होता येईल. या झिम्मा फुगडी व उखाणे स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे तसेच सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. झिम्मा फुगडी स्पर्धेत सहभागी होणार्‍या भगिनी विविध प्रकारच्या फुगड्या सादर करु शकतात. त्यामध्ये साधी फुगडी, गवळण, दंड फुगडी, लाटणे फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिकूट फुगडी, चौकट फुगडी, बस फुगडी, एकेरी वा दुहेरी फुगडी अशा विविध प्रकारच्या फुगड्या भगिनींना सादर करण्यात येतील. या झिम्मा फुगडी व उखाणे स्पर्धेतील विजेत्यांना पुढील प्रमाणे आकर्षक बक्षिसे देण्यात येतील - आकर्षक पुरस्कार १) झिम्मा - झिम्मा नारी पुरस्कार २) फुगडी - फुगडी ग फुगडी पुरस्कार ३) घागर घुमविणे - हेऽऽ घुमिव पुरस्कार ४) जात्यावरील ओव्या - कंठ पुरस्कार ५) छुई - फुई - ताल पुरस्कार ६) उखाणे - तल्लख पुरस्कार ७) घोडा - घोडा - चपळ पुरस्कार ८) काटवट काणा - तोल-मोल पुरस्कार ९) सुप नाचविणे - नृत्य कौशल्य पुरस्कार १०) पारंपारिक वेशभूषा - संस्कृती पुरस्कार.

टाईम्स स्पेशल

तसेच यावेळी भगिनी व युवतींची सदाबहार उखाणे स्पर्धा संपन्न होईल. या उखाणे स्पर्धेच्या विजेत्यांना देखील आकर्षक बक्षिसे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. या स्पर्धेत सर्व वयोगटातील भगिनी व युवती सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेसाठी नाव नोंदणी शनि. दि. २२ ऑगस्ट २०२६ पर्यंत श्रीराम मंदिर, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे करावयाची आहे. या स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी संपर्क पुढील प्रमाणे - १) सुनिल नलावडे - मोबा. ९८२२३८५०८४, २) मंदा चौगुले - मोबा. ९४२३८७५११४, ३) माया तांबे - मोबा. ९५४५२३५२२५. श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमूर्ती प्रतिष्ठानतर्फे श्रावणी मंगळवार निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भगिनी व युवतींच्या या झिम्मा फुगडी व उखाणे स्पर्धेत रत्नागिरी शहर व परिसरातील तसेच जिल्ह्यातील भगिनींनी वैयक्तिकरित्या व भगिनी मंडळांनी आवर्जुन सहभागी व्हावे आणि स्पर्धेचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg