loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय. हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल अँन्ड ज्यू. कॉलेज, खेड शाळेच्या विदयार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

खेड - अल मदिना वेलफेअर असोशिएशन व्दारा संचलित एम. आय. हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल अँन्ड ज्यू कॉलेज, खेड येथे शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत शहरी भागातील जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ४ विदयार्थ्यांनी स्थान प्राप्त केले. प्राथमिक विभागातून गोंधळेकर जोहान जाकीरहुसैन (इयत्ता ४ थी ) (गुणवत्ता यादी क्र. ४९),व माध्यमिक विभागातून चोगले अहमद आशिकअली ( इयत्ता ७ वी ) (गुणवत्ता यादी क्र. ४१), मुकादम सफवान जावीद ( इयत्ता ७ वी ) ( गुणवत्ता यादी क्र. ५७) व शेख आयेशा वसीम राजा ( इयत्ता ७ वी ) (गुणवत्ता यादी क्र. ६९) शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग घेऊन या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सहभागी या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पूर्व प्राथमिक विभागातून महाडिक मेहजबीन, सावंत पल्लवी, सरगुरोह फरजाना, सायमा परकार, खोत नुसरत, खोत फायजा, तांबे नगमा, मुल्लाजी नाहिदा, चव्हाण, माळी सुप्रिया तसेच माध्यमिक विभागातून राठोड एस. बी., चिखलकर रुक्सार, मरवा मुल्लाजी, नायदा मुल्लाजी, मुकादम उम्मेअम्मारा यानी अथक परिश्रम घेतले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बशीरभाई हजवानी, सर्व संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg