loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

दापोली (वार्ताहर) - दापोली ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली या संस्थेची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन मालू यांच्या अध्यक्षतेखाली सेवाव्रती शिंदे सभागृह दापोली येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या सभेत सभासदांना १२ टक्के लाभांश घोषित करण्यात आला. या सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे, २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाचा ताळेबंद, नफातोटा पत्रक मंजूर करणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफाविभागणीस मान्यता देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२०२५-२०२६ या आर्थिक वर्षात पतसंस्थेला ५० लाख ७७ हजार ५०७ रुपये नफा झाल्याची महिती अध्यक्ष सचिन मालू यांनी दिली. सर्व सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचीही घोषणा त्यांनी केली. झालेल्या नफ्यातून ५० टक्के रक्कम रिझर्व्ह फंडात वर्ग करणारी आपली एकमेव संस्था असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. संस्थेने ऑडिट वर्ग अ कायम राखला असून भागधारक सभासदांचा १ लाखाचा अपघाती विमा व ज्या सभासदांच्या २५ हजार व त्यापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी आहेत त्यांना ३ लाखाचे अपघाती विमा कवच देण्यात येणार असल्याचेहि अध्यक्ष मालू यांनी सांगितले. या वेळी सभासद रविंद्र राजाराम कलेकर याना कै.ऍड त्र्यंबकदास झंवर(काका) आदर्श ग्रंथालय आदर्श कार्यकर्ता राज्यस्तरीय २०२६ चा पुरस्कार मिळाल्याने त्यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

विविध विषयावर झालेल्या चर्चेत पतसंस्थेचे संस्थापक संचालक व दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जाळगावांकर यांनी संस्था वाढीसाठी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहेत. कोणकोणत्या सुधारणा करणे गरजेचे आहे. याचे मार्गदर्शन केले. संदीप खोचरे, एम आर शेठ्ये, रमेश कडू, शंतनू गोखले, निलेश जालगांवकर, सोनवणे, गुरव, अन्वर रखांगे यांनी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. या सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. उपाध्यक्षा रुचिता नलावडे यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले तर संचालक जगदिश वामकर यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg