loader
Breaking News
Breaking News
Foto

पपई जॅम अन् टोमॅटो केचअप निर्मितीचे वणोशीत धडे; 'कृषी स्नेही' समूहाचा स्तुत्य उपक्रम

दापोली (सागर गोवळे) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत 'कृषी स्नेही' समूहाच्या विद्यार्थिनींनी वणोशी तर्फ पंचनदी येथे स्थानिक महिला व शेतकऱ्यांसाठी ‘फळ व भाजीपाला प्रक्रिया’ या विषयावर विशेष प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. स्थानिक शेतीमालावर प्रक्रिया करून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे तंत्रज्ञान या वेळी उपस्थितांना शिकवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​विषयतज्ज्ञ डॉ. महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी पपईपासून जॅम आणि टोमॅटोपासून केचअप बनवण्याचे शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिक करून दाखवले. यामध्ये सायट्रिक ॲसिडचा वापर, साखरेचे योग्य प्रमाण, उष्णता नियंत्रण, सलग ढवळण्याची पद्धत आणि जॅम-केचअप तपासण्यासाठी ‘ब्लॉटिंग पेपर टेस्ट’ यांसारख्या सोप्या पद्धतींची सविस्तर माहिती देण्यात आली. ​ग्रामीण भागातील बचत गटांनी (SHG) अतिरिक्त उत्पादनावर प्रक्रिया केल्यास शेतीमालाची नासाडी टळून आर्थिक सक्षमीकरण साध्य होते, असा संदेश या वेळी देण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या 'पीएम-एफएमई' (PM-FME) योजनेच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग कसा सुरू करावा, यावरही चर्चा झाली.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमात परिसरातील महिला शेतकऱ्यांनी मोठा उत्साह दाखवला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी कन्या समृद्धी जाधव, नीलम मदने, तन्वी नादिवडेकर, श्रुती बोबडे, साक्षी लोके, अंकिता मुंज, सलोनी सावंत, कोमल झिरवाळ आणि आकांक्षा गाडगे यांनी विशेष मेहनत घेतली. ​हा उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. महेश कुलकर्णी, आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg