loader
Breaking News
Breaking News
Foto

सारंग विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना कै. चिंतामणी सहस्त्रबुद्धे व कै. मधुसूदन गाडगीळ गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान

दापोली (प्रतिनिधी) : नवरत्न शिक्षण संस्था संचलित सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र करमरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सारंग विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना कै. चिंतामणी सहस्त्रबुद्धे व कै.मधुसूदन गाडगीळ गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉ. सुनील गोरीवले, संस्थेचे कार्यकारी सदस्य तानाजी भुवड, संतोष पेंढारी, बाळा लयाळ, अर्पिता जोशी, सरपंच सुषमा जोशी, उपसरपंच संदीप मोहिते, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्राम अधिकारी साळुंखे, ब्राह्मणवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका पुनम जाधव, अंगणवाडी सेविका स्मिता गमरे, पोलीस पाटील सुचिता पेंढारी आदी प्रमुख मान्यवरांसह सारंग ग्रामस्थ व महिला मंडळ, शाळेचे आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोलीतील प्रख्यात डॉ. विद्या दिवाण यांच्यावतीने कै. चिंतामणी सहस्त्रबुद्धे गुणवत्ता पुरस्कार यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कामिनी अनंत काष्टे कळंबट व विराज गणेश धाडवे, ताडील बागवाडी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच सारंग हायस्कूलची माजी विद्यार्थिनी वैशाली प्रकाश गाडगीळ बांधतिवरे यांच्या वतीने कै. मधुसूदन गाडगीळ गुणवत्ता पुरस्कार गतवर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या इयत्ता ८ वी, ९ वी , १० वीतील विद्यार्थिनी अनुक्रमे विराणी उद्धव मिसाळ, सारंग आर्या केशव मळेकर, अडखळ व कामिनी अनंत काष्टे, कळंबट यांना प्रदान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

वरील दोन्ही पुरस्कार रोख रकमेचे पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारंग हायस्कूल चे मुख्याध्यापक संतोष हजारे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहास धाडवे शशिकांत मेंगाने, सरोज पैठणे, राजेश पवार, सुधीर शिगवण व स्वप्नील जाधव यांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg