संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोळवली येथे चौपदरीकरणाच्या कामामुळे मावळंगे, कुंभारखाणी तसेच खाडीपट्ट्यातून महामार्गावर येणाऱ्या वाहनांसाठी असलेले क्रॉसिंग काही दिवसांपूर्वी ठेकेदार कंपनीकडून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, चुकीच्या दिशेने वाहन चालवावे लागत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मावळंगे, कुंभारखाणी आणि खाडीपट्ट्यातील अनेक गावांमधून येणारी वाहने गोळवली येथे महामार्गाला जोडली जातात.
चौपदरीकरणाचे काम सुरू असताना याच ठिकाणी वाहनांना महामार्ग ओलांडण्यासाठी क्रॉसिंगची सुविधा उपलब्ध होती. मात्र, हे क्रॉसिंग बंद केल्याने स्थानिक वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. विशेषतः गोळवली मार्गे महामार्गावर येणाऱ्या वाहनांना काही ठिकाणी धोकादायक पद्धतीने उजव्या बाजूने किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याची शक्यता असून, मोठा अपघात घडण्यापूर्वी या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान जोडरस्ते व क्रॉसिंगच्या व्यवस्थेबाबत वाहनचालकांना स्पष्ट सूचना आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
महामार्गावरील कामांमुळे जोडरस्ते बदलल्याने वाहनचालकांना अडचणी येत असल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत.गोळवली रस्त्यासमोरील क्रॉसिंग पूर्वीप्रमाणे तातडीने सुरू करावे, अशी मागणी माजी पोलीस पाटील अप्पा पाध्ये, प्रसाद आमकर तसेच अन्य ग्रामस्थांनी केली आहे. क्रॉसिंग पूर्ववत न केल्यास योग्य मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. ठेकेदार कंपनीने स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पूर्वीप्रमाणे क्रॉसिंगची व्यवस्था तातडीने सुरू करावी आणि वाहनचालकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.