loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी ग्रामपंचायत उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्याने राजकीय खळबळ

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - साटेली-भेडशी उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्याविरोधात मंगळवारी सरपंच यांच्यासह आठ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतची नोटीस त्यांनी तहसीलदार राहुल गुरव यांना मंगळवारी दिली असून उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव दाखल होण्याची या ग्रामपंचायतमधील पहिलीच वेळ आहे. दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून साटेली-भेडशी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. राजकियदृष्ट्या या ग्रामपंचायतीचे महत्व फार मोठे असून अकरा सदस्य असलेली ही ग्रामपंचायत स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी नेहमीच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे संवेदनशीलरित्या पाहिले जाते. आज या ग्रामपंचायत क्षेत्रात झपाट्याने नागरी विस्तार होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता तर येथील उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केल्याने ही ग्रामपंचायत पुन्हा चर्चेत आली आहे. उपसरपंच हे सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. ते मनमानी कारभार करतात. सरपंच इतर सदस्यांबद्दल गैरसमज पसरवणे, विकासकामात अडथळे निर्माण करणे, असे आरोप उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्यावर केले आहेत. दाखल केलेल्या अर्जावर सरपंच छाया सखाराम धर्णे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जयराम मयेकर, विष्णू शिवा सुतार, सेजल संजय धर्णे, दिपाली किरण मोरजकर, शोभना किशोर जुवेकर, संपदा लक्ष्मण गवस, नीलपर्णा नारायण पार्सेकर, गणपत ज्ञानेश्वर डांगी यांच्या सह्या आहेत.

टाईम्स स्पेशल

बहुतांश ग्रामपंचायतमध्ये सरपंच, सचिव काम पाहतात उपसरपंच यांचा सहभाग सहसा नसतो, सरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला जातो. पण साटेली भेडशी सरपंच काही सदस्य यांनी उपसरपंच मनमानी कारभार करतात, सदस्यांना विश्वासात घेत नाही म्हणून दोडामार्ग तहसीलदारांकडे अविश्वास ठराव बाबत तक्रार दिली, याची जोरदार चर्चा साटेली भेडशीमध्ये सुरू झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg