loader
Breaking News
Breaking News
Foto

आरोग्य विभागातील रिक्त पदांचा डेटा सादर करा, आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवणार : आ. दीपक केसरकर

​सावंतवाडी: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेला चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने मतदारसंघातील सर्व रिक्त पदांचा डेटा सादर करावा, यासंदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठक घेऊन रिक्त पदांचा प्रश्न त्वरित मार्गी लावला जाईल, असे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित सावंतवाडी विधानसभा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या बैठकीला जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, सभापती सुस्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, सुदन कवठणकर, विलास नाईक, विजय नाईक, अपर्णा सातोस्कर, सुजाता पडवळ, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा आरोग्य अधिकारी लळीत, तहसीलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, राहुल गुरव, वेंगुर्ले गटविकास अधिकारी व्ही. एन. नाईक, सावंतवाडी गटविकास अधिकारी निलेश जाधव, सुकन्या टोपले यांच्यासह इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

बैठकीच्या सुरुवातीलाच सावंतवाडीच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रलंबित प्रश्न निकाली लावल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांचा जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी नगरसेवक राजू मसुरकर आणि रुग्ण कल्याण कृती समितीचे एन. बी. रेडकर यांनी अभिनंदन ठराव मांडून सत्कार केला. यावेळी जागेच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना आमदार केसरकर म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयाची ही जागा मूळची शासनाचीच असून सातबारावर महाराष्ट्र शासन असा उल्लेख आहे. त्यातील ५० गुंठे जागा शासनाच्या स्तरावर विशेष बाब म्हणून निर्णय घेऊन राजघराण्याला देण्यात आली. या रखडलेल्या प्रक्रियेसाठी त्यांनी सकारात्मक प्रतिज्ञापत्र दिल्याने हा मार्ग मोकळा झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg