loader
Breaking News
Breaking News
Foto

मोंड शाळा नं. १ येथे जलसंधारण दिन उत्साहात साजरा

देवगड (प्रतिनिधी) - जलसंसाधनाबाबत जनजागृती निर्माण करून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी राहण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. पाणी हे जीवनाचा आधार असून त्याचे संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे यांनी केले. सभापती गणेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गटविकास अधिकारी निलेश जगताप, मोंड प्रशासक शामल अनभवणे व प्रशासकीय समिती सदस्य अभय बापट, प्रशासकीय समिती सदस्य वैशाली अनभवणे, केंद्र प्रमुख तुषार औटी, मुख्याध्यापक प्रतिक्षा परब, शिक्षक वासुदेव सावंत यांच्या उपस्थितीत मोंड शाळा नं. १ येथे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून जलसंधारण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी गटविकास अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन तसेच उपलब्ध जलस्रोतांचे जतन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पावसाचे पाणी अडवणे व जिरवणे, तसेच जलस्रोतांचे संरक्षण करण्याबाबत उपस्थितांनी जलसंधारणाची शपथ घेतली. जलसंसाधनाबाबत जनजागृती निर्माण करून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा जलसंसाधन दिन म्हणून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये पाणी बचत आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यावेळी सभापती गणेश राणे यांनी जलसंधारणाच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा’ या संदेशातून जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी राधिका आचरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सृष्टी राणे, गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक प्रतीक्षा परब तर आभार शिक्षक वासुदेव सावंत यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg