loader
Breaking News
Breaking News
Foto

डोंबिवलीत तिरंगा रॅलीचा विश्वविक्रमी जल्लोष!

डोंबिवली - स्वातंत्र्य दिन केवळ स्वातंत्र्य दिन नव्हता; तो डोंबिवलीच्या राष्ट्रप्रेमाची, सामाजिक एकतेची आणि सामूहिक शक्तीची अभिमानाने नोंद करणारा ऐतिहासिक दिवस ठरला. ‘तिरंगा हाती घेऊया, विश्वविक्रम घडवूया’ या भावनेतून डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि डोंबिवलीतील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या विश्वविक्रमी तिरंगा रॅलीला डोंबिवलीकरांनी दिलेला प्रतिसाद अविस्मरणीय होता. तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा हजारो देशप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी हातात घेऊन डोंबिवलीच्या रस्त्यांवरून दिमाखात नेला. या ऐतिहासिक उपक्रमाची '' World Records India, Asia Book of Records आणि India Book of Records '' यांच्या माध्यमातून अधिकृत नोंद प्रक्रिया होणे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. आजच्या या विश्वविक्रमी तिरंगा रॅलीच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस सुरू असतानाही डोंबिवलीकरांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान स्मारकाला अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली लोकमान्य टिळक पुतळा, चार रस्ता, नेरुरकर पथ मार्गे दत्तनगरपर्यंत पोहोचली. संपूर्ण मार्गावर डौलाने फडकणारा विशाल तिरंगा, देशभक्तीपर घोषणा, गीतांनी भारलेले वातावरण आणि हजारो नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारा राष्ट्राभिमान हा अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे.या रॅलीत ५० हून अधिक शाळांमधील १० हजारांहून अधिक विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक, १०० हून अधिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माजी सैनिक, स्काऊट-गाईड, एनसीसी-एनएसएसचे कॅडेट, साहित्य, कला, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध क्षेत्रांत डोंबिवलीचे नाव उंचावणारे नागरिक सहभागी झाले. विविध क्षेत्रांतील सुमारे हजारो नागरिकांनी या राष्ट्रभक्तीच्या महाउत्सवात सहभाग नोंदवत तिरंग्याला मानवंदना दिली. दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान परिसरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ रॅलीचा समारोप झाला.

टाईम्स स्पेशल

यावेळी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला. तिरंगा हा केवळ तीन रंगांचा ध्वज नाही. तो भारताच्या एकतेचा, अखंडतेचा, त्यागाचा, शौर्याचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे. त्यामुळे एका विशाल तिरंग्याखाली हजारो नागरिकांनी एकत्र येणे, पक्षीय आणि सामाजिक भेद बाजूला ठेवून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी एकत्र उभे राहणे, हीच डोंबिवलीच्या सामाजिक एकतेची खरी ताकद आहे. या ऐतिहासिक रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे, पालकाचे, शिक्षकाचे, शाळांचे, सामाजिक संस्थांचे, माजी सैनिकांचे, एनसीसी-एनएसएसच्या कॅडेट्सचे, विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे आणि माझ्या प्रत्येक डोंबिवलीकर बंधू-भगिनीचे मी मनःपूर्वक आभार मानतो. यावेळी आमदार राजेश मोरे, उपज़िल्हा प्रमुख राजेश कदम तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg