loader
Breaking News
Breaking News
Foto

अपयश आणि निराशेला सामोरे जाण्याची मानसिक तयारी विद्यार्थ्यांमध्ये असणे गरजेचे : डॉ रुपेश पाटकर

मालवण (प्रतिनिधी) - प्रत्येक मागणीला होकार देण्याऐवजी योग्य वेळी ‘नाही’ स्वीकारण्याची सवय, तसेच अपयश आणि निराशेला सामोरे जाण्याची मानसिक तयारी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गातील मानसोपचार तज्ज्ञ, लेखक व समुपदेशक डॉ. रुपेश पाटकर यांनी कट्टा येथे बोलताना केले. कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि जूनियर कॉलेज येथे मानसोपचार तज्ज्ञ, लेखक व समुपदेशक डॉ. रुपेश पाटकर यांचे विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता आणि मानसिक आरोग्याबाबत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे पर्यवेक्षक महेश भाट, सहाय्यक शिक्षक एकनाथ राऊळ बाळकृष्ण वाजंत्री आदी व इतर उपस्थित होते. यावेळी डॉ. रुपेश पाटकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे विचार निर्माण होण्यामागील विविध कारणांवर तसेच अशा टोकाच्या परिस्थितीला प्रतिबंध करण्यासाठी शिक्षकांनी कोणती काळजी घ्यावी, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या मनातील भावना आणि अडचणी समजून घेण्याची गरज आहे, असेही डॉ. पाटकर यांनी स्पष्ट केले. शेवटी सहाय्यक शिक्षक बाळकृष्ण वाजंत्री यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg