खेड : ( दिलीप देवळेकर ) : खेड काऊन्सिल फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धा २०२६ चा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल बिसु, भरणा नाका (खेड) येथे उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, लेखनकौशल्य, सर्जनशीलता तसेच सामाजिक व राष्ट्रीय विषयांवर स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये खेड शहरातील व आसपासच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला होता. स्पर्धा यापूर्वी घेण्यात आली असून, त्यातील विजेत्या विद्यार्थ्यांचा या समारंभात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास मा. डॉ. आफिया नजीब पालेकर, सभापती, पंचायत समिती, खेड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. परवेज महाडिक, अध्यक्ष, खेड काऊन्सिल फाऊंडेशन होते, तर मा. हनिफ अलीसाहेब घनसार, विकास अधिकारी, दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड, शाखा–खेड व म. शमीम अ.कादिर चौगुले हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी विशेष मान्यवर म्हणून डॉ. अब्दुल लतिफ नोरे, रफिक अहमद खान महाडीक,सुलतान अब्दुल रज्जाक चौगुले ,फरीद इस्माईल मुकादम, अब्दुल अजीज इस्माईल माखजनकर,अनवर युनुस खान, गुलाम हुसैन परकार सर, इक्बाल हसन फकीह, सुल्तान अब्दुल करीम मुकादम, गुलाम अब्दुल्लाह परकार, मौलाना शब्बीर तांबे, मौलाना वजीहुद्दीन परकार,नजीर भाई फीरफीरे,शरीफभाई हमदुले, मेहबूब इब्राहिम मोहिमतुले, मन्सूर मुकादम,म.हुसेन काणेकर,मोहिद्दीन तळवलकर,फकीर महंमद नांदगावकर, नवाज इस्हाक सुर्वे, अलाऊद्दीन भाई ममतुले, सिराज अब्दुलाह पटेल, अर्सलान अहसान सुर्वे, फैज अली पटेल, हसन अब्दुल गणी मुकादम,दानिश पोत्रिक,वहाब उमर सैन, सिद्दिक भाई पोफलोणकर, हुसेन म.इस्हाक चौगुले,अ.गणी महाडीक, अ. कादीर चौगुले, आणि रियाज इकबाल हमदुले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
इयत्ता ७वी ते ९वी या गट अ मध्ये पूर्वा सूर्यकांत कदम (इयत्ता ८वी), नवभारत हायस्कूल व ज्यु. कॉलेज, भरणे (खेड) हिने ‘वाचन संस्कृतीची गरज’ या विषयावर निबंध सादर करून प्रथम क्रमांक मिळविला. रुची रोशन भुवड (इयत्ता ८वी), एल. टी. टी. इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यु. कॉलेज, खेड हिने द्वितीय क्रमांक, पूर्वी संदीप निवळकर (इयत्ता ८वी), एल. पी. इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज, खेड हिने ‘शिक्षण आणि तंत्रज्ञान’ या विषयावर तृतीय क्रमांक, तर समर्थ संतोष झांजे (इयत्ता ९वी), श्री. समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यु. कॉलेज, खेड याने चतुर्थ क्रमांक मिळविला.इयत्ता १०वी ते १२वी या गट ब मध्ये विश्रांती विलास भेरे (इयत्ता ११वी), ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव-खोंडे, खेड हिने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि शिक्षणाचे भविष्य’ या विषयावर प्रथम क्रमांक पटकावला. असिम सत्यम यादव (इयत्ता १०वी), एल. पी. इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज, खेड याने ‘स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री’ या विषयावर द्वितीय क्रमांक मिळविला. स्वरा उमेश देवकरकर (इयत्ता १०वी), एल. टी. टी. इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यु. कॉलेज, खेड हिने ‘मी शिक्षणमंत्री झाले तर...’ या विषयावर तृतीय क्रमांक मिळविला, तर स्वरा उमेश मोरे (इयत्ता ११वी), नवभारत हायस्कूल व ज्यु. कॉलेज, भरणे (खेड) हिने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि शिक्षणाचे भविष्य’ या विषयावर चतुर्थ क्रमांक मिळविला. दोन्ही गटातील प्रथम क्रमांकासाठी ₹२,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹१,५००, तृतीय क्रमांकासाठी ₹१,००० आणि चतुर्थ क्रमांकासाठी ₹५०० अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती. विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकासोबत प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर मांडलेले विचार, त्यांची लेखनशैली आणि सर्जनशीलता यांचे मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशावर समाधान न मानता नियमित वाचन, लेखन, चिकित्सक विचार आणि सामाजिक जाणीव जोपासावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या विचारांना व्यासपीठ मिळाले असून, भविष्यातही शिक्षण, साहित्य, सामाजिक जाणीव आणि युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प खेड काऊन्सिल फाऊंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खेड फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य, स्वयंसेवक व हितचिंतक यांनी परिश्रम घेतले.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.