loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगर परिषदेमार्फत देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा व गुणवंतांचा गुणगौरव

सावंतवाडी(प्रतिनिधी)- सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै सभागृहामध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गेल्या सहा वर्षांनंतर पुन्हा नव्याने व मोठ्या उत्साहाने शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवून शहरामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते प्रिंटर प्रदान करून करण्यात आला. या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेमध्ये सावंतवाडी शहरातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेचे निकाल तीन गटांमध्ये जाहीर करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पहिली ते चौथी गट - प्रथम क्रमांक - सावंतवाडी एज्युकेशन प्राथमिक शाळा, द्वितीय क्रमांक - जि. प. शाळा नं. ६, तृतीय क्रमांक - जि. प. शाळा नं. ४, उत्तेजनार्थ- मिलाग्रीस मराठी; पाचवी ते सातवी गट - प्रथम क्रमांक - मदर क्वीन हायस्कूल, द्वितीय क्रमांक - शाळा नं. ४, तृतीय क्रमांक - राणी पार्वतीदेवी हायस्कूल, उत्तेजनार्थ - कळसुळकर इंग्लिश स्कूल; आठवी ते दहावी गट -प्रथम क्रमांक - कळसुळकर इंग्लिश स्कूल, द्वितीय क्रमांक - मिलाग्रीस हायस्कूल, तृतीय क्रमांक - मदर क्वीन हायस्कूल, उत्तेजनार्थ - राणी पार्वतीदेवी हायस्कूल. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ क्रमांक मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांना झाडांचे वाटप करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये शहरातून प्रथम, द्वितीय तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भरघोस शैक्षणिक शिष्यवृत्ती, चेक व शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. हा गुणगौरव महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पर्यटन व उद्यान सभापती शर्वरी मडगावकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, उपसभापती सुनीता पेडणेकर, नगरसेवक ऍड. सिद्धार्थ भांबोरे, नगरसेविका दुलारी रांगणेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक व ऍड. सायली दुभाषी यांच्या हस्ते करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाला सावंतवाडी शहरातील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग दर्शविला होता. देशभक्तीपर गीतांनी सभागृह दणाणून गेले होते. सावंतवाडी शहरातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन नगरसेविका दुलारी रांगणेकर व नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी केले. आभार उपसभापती सुनीता पेडणेकर यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg