मंडणगड(प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाची सामाजिक बांधिलकी जपत कुडूक बुद्रुक बोरीचा कोंड येथील मुंबईकर चाकरमानी स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळ आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे येत आपल्या गावात विविध प्रकारच्या १५० झाडांच्या रोपांची लागवड करत एकीच्या जोरावर पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. हे मंडणगड तालुक्यातील गावांना आदर्शवत असेच काम आहे.
मंडणगड तालुक्यातील कुडूक बोरीचा कोंड येथील ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबई मंडळ, नवतरुण विकास मंडळ तसेच जिल्हा परिषद आदर्श शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक दिवस आपल्या गावासाठी या न्यायाने आपल्या गावात वृक्षारोपण करत आपली सामाजिक बांधिलकी जपली. गावात प्रथमच व्यापक स्वरूपात राबविण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आदर्शवत ठरला असून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, कुडूक बुद्रुक बोरीचा कोंड येथील माजी विद्यार्थी समितीची सभा घेण्यात आली. शाळेच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमानंतर नवतरुण विकास मंडळ, कुडूक बुद्रुक बोरीचा कोंड, ग्रामस्थ, महिला मंडळ व संलग्न मुंबई मंडळ यांच्या पुढाकाराने गाव परिसरात पर्यावरणपूरक वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत उमरोलीच्या वतीने या उपक्रमासाठी १५० झाडे उपलब्ध करून देण्यात आली. वृक्षारोपणासाठी सर्वांनी सहभागी होत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावात पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली. पर्यावरणपूरक उपक्रमाची जोड देत ग्रामस्थांनी समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.