सावंतवाडी : येथील बहुप्रतिक्षित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अडसर ठरलेली जमिनीची कायदेशीर कोंडी अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. राजघराण्याच्या दोन्ही कुटुंबानी जागेसाठीचे संपतीपत्र दिले असून उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात गुरुवारी २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ॲड. शिशिर हिरे यांनी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह या नियोजित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. हे रूग्णालयात उभारण्यासाठी १४ नोव्हेंबर २०१८ रोजी शासनाने ३६.५६ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली होती. १७.६६ कोटी रुपयांचा करारनामा होऊन २४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन होते.
मात्र, उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दिवाणी दाव्यामुळे ही जमीन न्यायप्रविष्ट बनली होती. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जागेचे प्रत्यक्ष हस्तांतरण होऊ शकले नव्हते. महसूल व वनविभागाने २६ जुलै २०२३ रोजी विशेष शासन निर्णय जारी करून जिल्हाधिकाऱ्यांना तडजोड कराराचे निर्देश दिले होते. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार एकूण १४,३७७.९० चौ. मी. जागेपैकी ५,००० चौ. मी. खुले क्षेत्र प्रतिवादींना विनामोबदला देण्याचे निश्चित झाले. तसेच न्यायालयात १४०० स्क्वेअर मीटर जागा देण्याबाबतही तडजोड झाली असून बांधकामासाठी प्रत्यक्ष ५,५०९.२८ चौ. मी. क्षेत्र शिल्लक राहिले आहे. भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार जुना आराखडा अपुरा पडत असल्याने, ६ मे २०२६ रोजी मुंबईत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानुसार खाजगी वास्तुशास्त्रज्ञांमार्फत सुधारित आराखडे व अंदाजपत्रक तयार करून ते मंजुरीसाठी राज्याच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञांकडे (मुंबई) सादर करण्यात आले आहेत.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ॲड. शिशिर हिरे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, पीडब्ल्यूडी अधिकारी लोहार, महसूल विभागाचे प्रतिनिधी किरण गजिनकर यांच्यासह रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि नागरिक उपस्थित होते. प्रशासकीय मान्यता व मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष बांधकामाचा शुभारंभ होणार असल्याने सावंतवाडीकरांना लवकरच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.