रत्नागिरी : (जमीर खलफे) - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभरात २१ ऑगस्ट हा दिवस ‘जलसंधारण दिन’ म्हणून अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिनानिमित्त पाणी अडवा, पाणी जिरवा आणि जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा महत्त्वपूर्ण संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी, दिनांक २१ ऑगस्ट रोजी (शुक्रवारी) सकाळी ७ वाजता रत्नागिरी शहरात ‘महावॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाचे अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले.
पाणी आणि माती संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी लोकचळवळ उभारणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या वॉकेथॉनची सुरुवात शहरातील ऐतिहासिक जयस्तंभ येथून झाली. जयस्तंभ ते माळनाका आणि तेथून पुन्हा जयस्तंभ असा एकूण ३ किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत ही वॉकेथॉन संपन्न झाली. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात सुरू झालेल्या या महावॉकेथॉनमध्ये रत्नागिरीकरांचा उत्साह पाहण्यासारखा होता. शासकीय अधिकारी, विविध विभागांचे कर्मचारी, तरुण, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक खेळाडू, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते. हातात पाण्याचे महत्त्व सांगणारे फलक घेऊन सर्व सहभागींनी रत्नागिरीकरांचे लक्ष वेधून घेतले. वाढत्या प्रदूषणाच्या आणि हवामान बदलाच्या काळात जमीन आणि पाण्याचे रक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे. या वॉकेथॉनच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाने जलसंधारणाच्या कार्यात सक्रिय योगदान दिले पाहिजे, असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. जयस्तंभ येथे वॉकेथॉनचा यशस्वी समारोप झाला असून, या जनजागरूकता अभियानाला रत्नागिरीकरांनी दाखवलेल्या भरघोस प्रतिसादामुळे संपूर्ण उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.