रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): मिरजोळे एमआयडीसी येथील औद्योगिक अपघातात मयत झालेल्या कामगाराच्या नुकसानभरपाई प्रकरणात कामगार न्यायालय, रत्नागिरी यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या खटल्यामध्ये कंत्राटदार 'आयुष फॅब्रिकेशन अँड वेल्डिंग'चे प्रोप्रायटर लहू आत्माराम शेलार यांच्या वतीने ॲड. एस. एस. तडवी यांनी केलेल्या प्रभावी, अभ्यासपूर्ण व कायदेशीर युक्तिवादामुळे कंत्राटदाराची सर्व प्रकारच्या आर्थिक व कायदेशीर दायित्वातून पूर्णपणे निर्दोष मुक्तता झाली असून, संपूर्ण १४ लाख ७७ हजार ९५० रुपयांची नुकसानभरपाई न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीनेच अदा करावी, असा महत्त्वपूर्ण निकाल कामगार न्यायालयाने पारित केला आहे. वरॉन ॲल्युमिनिअम प्रा. लि. (मिरजोळे एमआयडीसी) या कंपनीने फॅब्रिकेशन व दुरुस्तीचे काम कंत्राटदार मे. आयुष फॅब्रिकेशन अँड वेल्डिंग यांना दिले होते. दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी काम सुरू असताना छताचा सिमेंटचा पत्रा तुटून कामगार अभिजित आत्माराम शेलार हे खाली पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर मुख्य नियोक्ता असलेल्या वरॉन ॲल्युमिनिअम कंपनीने १४,७७,९५० रुपयांची रक्कम कामगार न्यायालयात जमा केली; मात्र त्यानंतर सदर रक्कम कंत्राटदार आयुष फॅब्रिकेशन व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्याकडून वसूल करून मिळावी, असा दावा न्यायालयासमोर मांडण्यात आला होता. सुनावणीदरम्यान विमा कंपनीने स्वतःचे दायित्व झटकण्यासाठी अनेक तांत्रिक बचाव उभे केले. कामगार ४० फूट उंचीवर काम करताना पडला असून विमा केवळ जमिनीवरील कामासाठी होता, त्यामुळे पॉलिसीच्या अटींचा भंग झाला आहे, असा दावा विमा कंपनीतर्फे करण्यात आला होता. यावर कंत्राटदार आयुष फॅब्रिकेशनतर्फे ॲड. एस. एस. तडवी यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याचा सखोल उलटतपास घेतला आणि पॉलिसीमध्ये 'उंचीवरील कामास मनाई' असा कोणताही स्पष्ट अपवाद नसल्याची थेट कबुली साक्षीदाराकडून मिळवली. तसेच फॅब्रिकेशन व्यवसायाचे स्वरूप माहीत असताना व २५ कामगारांचा रीतसर प्रीमियम स्वीकारल्यानंतर विमा कंपनी जबाबदारी टाळू शकत नाही, हा कायदेशीर मुद्दा ॲड. एस. एस. तडवी यांनी न्यायालयासमोर अत्यंत प्रभावीपणे मांडून विमा कंपनीचा तांत्रिक बचाव पूर्णपणे निष्प्रभ ठरवला.
कामगार नुकसानभरपाई आयुक्त तथा न्यायाधीश सुमित वि. जोशी यांनी कंत्राटदार आयुष फॅब्रिकेशनतर्फे ॲड. एस. एस. तडवी यांनी मांडलेला सडेतोड कायदेशीर युक्तिवाद पूर्णपणे ग्राह्य धरत कंत्राटदार आयुष फॅब्रिकेशनला सर्व आर्थिक व कायदेशीर जबाबदारीतून निर्दोष मुक्त केले. विमा पॉलिसी अपघाताच्या वेळी पूर्णपणे वैध असल्यामुळे न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीने ही संपूर्ण १४,७७,९५० रुपयांची रक्कम अर्जदार कंपनीस एका महिन्याच्या आत अदा करावी, असा थेट आदेश न्यायालयाने दिला. तसेच न्यायालयात जमा असलेली ही रक्कम मयत कामगाराच्या पत्नी, अल्पवयीन मुलगी व वृद्ध आई-वडिलांच्या बँक खात्यात व्याजासह वितरित करण्याचे आदेश देण्यात आले. प्रस्तुत प्रकरणात कंत्राटदार आयुष फॅब्रिकेशन अँड वेल्डिंगतर्फे ॲड. एस. एस. तडवी यांनी काम पाहिले.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.