loader
Breaking News
Breaking News
Foto

स्व. अरविंद अमृते यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जीवनकार्यावरील पुस्तकाचे दापोली येथे प्रकाशन

दापोली (वार्ताहर): कै. अरविंद अमृते यांचा जीवनप्रवास, सामाजिक कार्य आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वावर आधारित आत्मचरित्राचे प्रकाशन नुकतेच दापोलीतील शिंदे सभागृह, येथे उत्साहात करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभ प्रसंगी व्यासपीठावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, पंचायत समिती दापोलीचे सभापती उन्मेष राजे, दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग, संस्थेच्या अध्यक्ष शैला अमृते , डॉ. संजय तोराणे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी कै. अरविंद अमृते यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्यांनी समाजासाठी केलेले योगदान, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी कार्याचा उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या जीवनकार्याची आठवण भावी पिढीला व्हावी आणि त्यांच्या विचारांना पुढे नेण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अमृते सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा शैला अरविंद अमृते यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अस्मिता परांजपे यांच्या कोकण गीताने करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत आशिष अमृते यांनी केले. ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg