खेड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साईकृपा एकता सोशल वेलफेअर फाउंडेशनतर्फे आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत खेड तालुक्यातील तिसे, मुरडे आणि आंबये परिसरातील एकूण ८ शाळांना भेट देऊन सुमारे १५० ते १६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात तिसे शिगवणवाडी शाळा, तिसे शिंदे सकपाळवाडी शाळा, तिसे मराठी शाळा, मुरडे गोठळवाडी शाळा, मुरडे शिंदेवाडी शाळा, केंद्रीय शाळा मुरडे क्र. १, आंबये धर्मशाळा आणि आंबये पाटीलवाडी शाळा या शाळांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात आवश्यक मदत मिळावी, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य आणि शिक्षणाबद्दल दिसून आलेली उत्सुकता यामुळे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद व कौतुक हीच या सामाजिक उपक्रमाची खरी पावती ठरली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देणगीदार, स्वयंसेवक, समिती सदस्य, ग्रामस्थ, शिक्षकवृंद, पालक तसेच समाजातील विविध घटकांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे राबविता आला. याबद्दल फाउंडेशनतर्फे सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, स्थानिक नागरिक, पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन आणि सामाजिक क्षेत्रातून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशनने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल कार्यकर्त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. “सेवा हिच खरी मानवता” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन साईकृपा एकता सोशल वेलफेअर फाउंडेशन समाजहितासाठी सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही शिक्षण, आरोग्य आणि समाजकल्याण क्षेत्रात विविध लोकहितकारी उपक्रम राबविण्याचा निर्धार फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.