loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामीण, शहर व तालुका पातळीवरील पोलिस स्थानकात फाईलबंद झालेल्या महत्वपूर्ण तक्रारींची फेरपडताळणी करण्याची जनतेची मागणी

रत्नागिरी (टाइम्स डिजीटल डेस्क) - रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण, शहर व तालुका पातळीवरील पोलिस स्थानकांत सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या समस्यांबाबत केलेल्या तक्रारींची प्राथमिक चौकशी न करता किंवा प्राथमिक चौकशी करुन अनेक तक्रारींच्या फाईल्स ‘फाईल बंद’ ठेवण्यात आल्याचे समोर येत आहे. ग्रामीण भागातील नागरिक आपल्या समस्या घेवून पोलिस स्थानकात येतात, त्या तक्रारींची नोंद घेतली जाते. प्राथमिक स्वरुपात तक्रारदार आणि प्रतिवादी यांचे म्हणणे समजून घेतले जाते, त्यानंतर काही प्रकरणात फाईल बंद होते. अनेक तक्रारी कोणतीही सखोल चौकशी न करता फाईल बंद करण्यात आल्याचे देखील उघडकीस येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्राथमिक तपासानंतर ज्या फाईल बंद करण्यात आल्या आहेत. त्या फाईल्सची फेर पडताळणी व फेर आढावा तपासणी आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांमधून सांगितले जाते. एखाद्या घटनेमध्ये न्याय मिळावा यासाठी सामान्य माणूस पोलिस स्थानकाचा आधार घेतो. अशा नागरिकाला पोलिस खात्याचा मोठा आधार असतो, मात्र काही वेळा महत्वाची प्रकरणे फाईलबंद केली जातात. अशा प्रकरणांचा शोध घेवून फेर पडताळणी करण्याचे आदेश जिल्हा पातळीवरुन पोलिस यंत्रणेने द्यायला हवेत. अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg