loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळण्यासाठी शिवराय फाऊंडेशन डोंबिवलीकडून आडे हायस्कूलला क्रीडा साहित्याची भेट

दापोली (प्रतिनिधी) : डोंबिवली येथील शिवराय फाऊंडेशनने आपले सामाजिक दायित्व जपत दापोली तालुक्यातील आडे येथील कै. पद्मश्री श्री. म. तथा अण्णासाहेब बेहेरे विद्यालयातील विदयार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच विविध क्रीडा विषयक साहित्यांची भेट देत विदयार्थ्यांप्रती असलेली आपली बांधिलकी जपली आहे. दापोली एज्युकेशन सोसायटी दापोली संचलित कै. पद्मश्री श्री. म. तथा अण्णासाहेब बेहेरे विद्यालय आडे येथे कार्यरत आहे. या विदयालयात शिक्षणाचे धडे गिरवणा-या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासोबतच विविध खेळांचीही आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील क्रीडा कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावे आणि शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच संघ भावना, शिस्त व नेतृत्वगुण विकसित व्हावेत या प्रमुख उद्देशाने संदेश मोरे आणि स्मिता मोरे यांनी आपल्या डोंबिवली स्थित शिवराय फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक शैक्षणिक साहित्याबरोबरच गरजेचे असलेले क्रिडा साहित्य देखील भेट दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांमध्ये विविध खेळांची रुची निर्माण व्हावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, या लाल तांबड्या मातीतून नवा इतिहास घडावा या सद्भावनेने साहित्य भेट देण्यात आले. या क्रिडा साहित्याच्या वापरातून विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरीच्या जोरावर मजल मारता येईल हा प्रमुख दृष्टिकोन समोर ठेवून क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशा या शैक्षणिक आणि क्रिडा विषयक साहीत्य वाटपाचा कार्यक्रम आडे विद्यालयात दापोली पंचायत समिती सदस्य संदीप चिखले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

टाईम्स स्पेशल

यावेळी पद्मश्री श्री.म.तथा अण्णासाहेब बेहेरे विद्यालय आडेचे मुख्याध्यापक विजयकुमार गाडे, जोशी, शैलेश धोपट तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आडे पोलिस पाटील तेजश्री कालेकर, उंबरशेत ग्राम पंचायतीचे माजी सरपंच सदानंद ऊर्फ काका श्रीवर्धनकर, आंबवली बुद्रुक ग्राम पंचायतीचे सरपंच विष्णू वजिरकर, सुकोंडी ग्राम पंचायतीचे सरपंच रमेश ऊर्फ भरत हुमणे, इळणे पंचक्रोशीचे अध्यक्ष मोरे, इळणे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच योगेश रहाटवळ, माजी उपसरपंच तुषार रांगले, मनोज रुके, नरेश पवार, गणपत मुरूडकर, बाबुराव मुरूडकर, विनोद मोरे, मनोज मोरे, सिध्दार्थ मोरे, अजित मोरे, महेंद्र मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg