loader
Breaking News
Breaking News
Foto

२३ ऑगस्ट रोजी अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका आयोजित "श्रावण भजन महोत्सव २०२६ "

वरवेली (गणेश किर्वे) - अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (महा.) रजि. नोंदणी क्रमांक: रजि. बृहन्मुंबई/संलग्न अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका आयोजित "श्रावण भजन महोत्सव २०२६" चे आयोजन रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी भंडारी भवन, गुहागर किर्तनवाडी रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ८ वा.रिंगण सोहळा (भंडारी भवन पटांगण), सकाळी ९ वा.चहा / नाष्टा, सकाळी १० वा.कार्यक्रमाचे उद्घाटन आणि दिप प्रज्वलन,मान्यवरांचा सत्कार आणि मनोगत, सकाळी १०,३० वा.गुहागर तालुक्यातील भजन मंडळांचे भजन सादरीकरण, दुपारी १ वा.स्नेह भोजन, दुपारी ३ वा. नंतर बुवा संतोष शिर्सेकर, बुवा श्रीधर मुणगेकर, बुवा रामदास कासले, बुवा भगवान लोकरे, बुवा प्रमोद हर्याण व इतर मान्यवरांचा गायन कार्यक्रम, सायं. ५ वा.त्रिमुर्तीचा अमृत महोत्सव वाढदिवस सोहळा, सायं. ६ वा.भैरवीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी आमदार भास्करशेठ जाधव, माजी आमदार डॉ.विनय नातू, कृषी सभापती महेश नाटेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, जिल्हा परिषद सदस्य नेत्राताई ठाकूर,जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, जिल्हा परिषद सदस्य अपूर्वा बारगोडे,गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, गुहागर नगराध्यक्ष निता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, तहसिलदार परिक्षीत पाटील, गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, श्री दुर्गादेवी देवस्थान अध्यक्ष किरण खरे, श्री व्याडेश्वर देवस्थान अध्यक्ष शार्दुल भावे, अखिल भजन सां. हि. मंडळ महा. राज्य अध्यक्ष भगवान लोकरे बुवा, सचिव प्रमोद हर्याण बुवा, अखिल भजन सां. हि. मंडळ रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संतोष शिर्सेकर बुवा, सर्व गुहागर पंचायत समिती सदस्य आणि गुहागर नगरपंचायतचे नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

टाईम्स स्पेशल

आपली भजन परंपरा टिकून रहाणे. कलाकाराला आपली कला जोपासता यावी. भजन माध्यमातून समाजप्रबोधन होवून हिंदवी भागवत सनातन धर्माची पताका उंचवावी. ईश्वर रुपी सेवेचा मिळालेला वारसा जपता यावा. वृध्दापकाळात कलाकारांना दुस-यावर अवलंबून न राहता त्यांना आपण केलेल्या कलेच्या सेवेचा शासनाकडून मिळणारा मोबदला मिळावा तसेच सर्व भजनी कलाकार एक व्हावे. संघटीत रहावे. यासाठी या भजनी मेळाव्याचे नियोजन केलेले आहे.तसेच भजनसम्राट बुवा श्रीधर मुणगेकर, बुवा रामदास कासले, बुवा भगवान लोकरे या तीन बुवांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा संपन्न करावयाचा आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg