loader
Breaking News
Breaking News
Foto

डांगमोडे सुपुत्र दीपक ठाकूर यांना राष्ट्रपती पदक व अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील डांगमोडे गावचे सुपुत्र आणि बृहन्मुंबई येथे गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले दिपक अनंत ठाकूर यांना पोलीस दलातील सेवेबद्दल राष्ट्रपती पदक (गुणवत्ता पूर्ण सेवा) जाहीर झाले आहे. तसेच ३५ वर्ष अविरत सेवे बद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाचे 'अतिउत्कृष्ट सेवा पदक' सुद्धा त्यांना जाहीर झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले दीपक ठाकूर हे १९९१ मधे मुंबई पोलीस दलात दाखल झाले. ३५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांच्या निष्कलंक, शिस्तबद्ध, उत्कृष्ट सेवा कामगिरीची दखल घेऊन यापूर्वी विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यापूर्वी त्यांनी जुहू, ओशिवरा, कांदिवली पोलीस स्टेशनला काम केले आहे. २०१० साली त्याना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते.

टाईम्स स्पेशल

स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील पोलीस, कारागृह, अग्निशामक आणि होमगार्ड दलातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना घोषित झालेल्या राष्ट्रपती पदक व सेवा पदकांची घोषणा १४ ऑगस्टला झाली होती. यामध्ये दीपक ठाकूर यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले. याबद्दल १५ ऑगस्ट रोजी मुंबई पोलीस मुख्यालयात मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दीपक ठाकूर यांचा त्यांच्या कुटुंबासमवेत सत्कार करत अभिनंदन केले. डांगमोडे येथील राजेंद्र ठाकूर, नारायण ठाकूर यांचे ते भाऊ असून दीपक ठाकूर यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg