loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीची गरजू कुटुंबाला मदत

खेड, (प्रतिनिधी )- भालचंद्र पाटणे यांच्या सौजन्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्यावतीने भरणे येथील कुमारी नेहा बुटाला हिच्या कुटुंबाला जिन्नस स्वरूपात मदत करण्यात आली. कुमारी नेहा बुटाला हिच्यावर नुकतेच डोळ्याच्या ट्युूमरचे ऑपरेशन झाले असून, तिच्या पायावर यापूर्वी तीन वेळा ऑपरेशन झाले आहे. अनेक अडचणींचा सामना करत नेहा जिद्दीने जीवन जगत आहे. तिच्या कुटुंबाला आधार मिळावा या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्यावतीने ही छोटीशी मदत करण्यात आली. या उपक्रमावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सचिव उत्तम कांबळे, माजी अध्यक्ष ला. रोहन विचारे, माजी अध्यक्ष ला. महेंद्र शिरगावकर, बी.एड. कॉलेज भरणेच्या प्राचार्या सौ. संगीता सूर्यवंशी, प्रा. अश्विनी कडाळे, जानकर तसेच नेहाचे आई-वडील उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg