loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्लेत जलसंधारण दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

दापोली(प्रतिनिधी)- आंजर्ले येथील एम. के. इंग्लिश स्कूल, मध्ये २१ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन उत्साहपूर्ण वात्तावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील एम. के. इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात जलसंधारण दिन साजरा केला. या निमित्ताने प्रशालेत निबंध स्पर्धा व वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वादविवाद स्पर्धेसाठी ‘जलसंवर्धन करणे ही जनतेची जबाबदारी’ हा विषय तर ‘जल संवर्धन करणे ही शासनाची जबाबदारी’ हा विषय जलरक्षक गटासाठी देण्यात आला. दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांनी आपापली भूमिका प्रभावीपणे मांडत जलसंवर्धनासाठी शासन आणि जनता यांच्या संयुक्त प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी आंजर्ले ताडाचा कोड येथील जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष मुकेश राळे यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना पाणी अडवा, पाणी जिरवा या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन, जलसाठ्याचे संवर्धन तसेच पाणी जमिनीत जिरविण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. रंगतदार वादविवाद स्पर्धेत जलमित्र गटाने विजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या वक्तृत्व कौशल्याचा आणि विचारक्षमतेचा प्रभावी परिचय करुन दिला.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक संदिप गोरीवले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संपूर्ण स्पर्धेचे नियोजन व मार्गदर्शन सहा. शिक्षिका पवार व बेडेकर यांनी केले. यावेळी जलसंपत्तीचे संवर्धन करून भावी पिढीसाठी पाण्याचे स्त्रोत सुरक्षित ठेवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg