loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश बी. आर. गवईनी घेतले श्री देव पाटेकर देवस्थानचे दर्शन

सावंतवाडी (प्रतिनिधी) - भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी संस्थानचे आराध्य दैवत श्री देव पाटेकर देवस्थानला भेट दिली. यावेळी त्यांनी पाटेकर देवाचे दर्शन घेऊन भक्तिभावाने आशीर्वाद घेतले. पाटेकर देवस्थान येथे आगमन झाल्यानंतर सरन्यायाधीशांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मंदिरात विशेष पूजा आणि धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दर्शन घेतल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी देवस्थानच्या परिसराची व ऐतिहासिक महत्त्वाची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी उपस्थित राहून सरन्यायाधीशांचे स्वागत केले. या दौऱ्यादरम्यान विधी क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर आणि वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

टाईम्स स्पेशल

यामध्ये मुंबई - गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा सदस्य ॲड.संग्राम देसाई, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, ॲड. शामराव सावंत, ॲड. संदीप निंबाळकर, अँड अमोल कविटकर, अँड अमोल सामंत यांच्यासह इतर अनेक वकिलांनी सरन्यायाधीशांची भेट घेतली. श्रावण सोमवारच्या निमित्ताने झालेल्या या विशेष भेटीमुळे पाटेकर देवस्थान परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg