तिलारी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ‘निपुण महाराष्ट्र अभियाना’अंतर्गत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा बोडदे येथे इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या मातांचा ‘निपुण माता मेळावा’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यात मातांचा सक्रिय सहभाग घेऊन माता गटाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मातांनी घरी मुलांचा अभ्यास घेणे, तसेच वाचन, लेखन व गणितातील मूलभूत संकल्पनांचा सराव करून घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढवून समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट सहभाग घेणाऱ्या तसेच मुलांच्या अभ्यासासाठी चांगले काम करणाऱ्या मातांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मातांच्या सहभागाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंजुश्री परब, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी नाईक, शितल गवस तसेच इतर माता सदस्य आणि गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष सहकार्य केले. या उपक्रमाचे केंद्रप्रमुख दत्ताराम दळवी, तालुका निरीक्षक रघुनाथ सोनवलकर व गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांनी विशेष कौतुक केले. मातांचा शाळेच्या शैक्षणिक प्रक्रियेत वाढता सहभाग हा ‘निपुण महाराष्ट्र अभियाना’च्या यशासाठी महत्त्वाचा ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.